हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अनेक हॉलिवूड चित्रपटात दिसणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू जॉन सीनाने इंस्टाग्रामवर अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बिग बींनी पारंपारिक पोशाख घातला होता तर अभिषेकने कोट घातला होता. जॉन सीना ने या फोटोला कोणतीही कॅपशन दिलेली नाही . यापूर्वीही जॉनने अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर हे नक्की झाले की ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचाही कोरोना अहवाल पोझीटीव्ह आला आहे. याबाबत एक अपडेट शेअर करत अभिषेकने ट्विटरवर लिहिले होते की, “ऐश्वर्या आणि आराध्या यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि त्या दोघीही घरातच स्वतः ला self quarantine करतील. आपल्या शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                    