मुंबई | बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार याना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईनमधून मुक्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. ते बिहारहून मुंबईला आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारीला क्वारंटाईन केल्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज त्यांची क्वारंटाईन रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्याताना महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, म्हणूनच त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले, असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
विनय तिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईहून पाटण्याहून रवाना होतील. बीएमसीने विनय तिवारी यांना मेसेजद्वारे क्वारंटाईन समाप्त करत आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, बीएमसीनेही या आदेशाची प्रत बिहार पोलिस मुख्यालयात पाठविली आहे. विनय तिवारी यांना फोनवर सांगण्यात आले आहे की, संध्याकाळी ५ ते ५.३० वाजताचे विमान आहे. हे विमान व्हाया हैदराबाद असून ते पाटण्याला जाणार आहे.