हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सोनू सूद या कोरोना संकटाच्या महामारीत गरिबांसाठी देवदूत बनला आहे.लॉकडाउन मध्ये अडकलेल्या मजुरांना घरी पोहचवणं असो, किंवा परदेशी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे असो, शेतीसाठी अवजारांची मदत किंवा मग वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, अगदी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल लागणार असेल तर एक नाव लगेच समोर येतं अभिनेता सोनू सूद. या कामामुळे सोनूला नेटकऱ्यांनी ‘ब्रदर ऑफ द नेशन’ची उपाधी दिलीय. हे सर्व करताना त्याला आनंद वाटत असला तरी एका गोष्टीचं शल्य नेहमी त्याला टोचत असल्याचे सोनूने सांगितले.
लोकांची पायपीट होताना ज्या घटना समोर आल्या. त्या मनाला हेलावून टाकणाऱ्या होत्या. त्यातूनचं त्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. या मदतीदरम्यान लोकांचा जो विश्वास निर्माण तो मला जास्त महत्वाचा आहे. माझ्याकडे नियमित दोनशेच्या आसपास मॅसेज, दोन हजारच्या आसपास ईमेल येतात. माझं कुटुंब आणि टीम हे सर्व तपासतो आणि मग आम्ही ठरवतो की कोणाला मदत करायची.
मी सर्वांची मदत करु शकत नाही, याचं दुःख वाटतं. मात्र, सर्वांपर्यंत वेळेत मदत पोहचवण्यासाठी माझा प्रयत्न असतो. माझ्या मदतीने लोकांची कामं पूर्ण होतात, तो आनंद माझ्यासाठी सर्वात जास्त आहे. तुम्ही कोणतंही काम करताना हे गृहीत धरुन चलायचं की तुमच्या कामावर लोक बोलणारचं. मात्र, त्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे काम करतचं राहिलं पाहिजे, अशी संदेशही सोनू सूदने दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’