हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्या नंतर सर्वच स्तरातून अभिनेत्री कंगना राणावत वर टीकेची झोड उठली .आता अभिनेत्री कंगना रणौतने यु-टर्न घेतल्याचं दिसून येत आहे. ‘मला महाराष्ट्र आवडतो’, असं ट्विट कंगनाने केलं आहे.
“यश मिळाल्यानंतर मला अनेक मोठ्या बॅनरचे, दिग्गज कलाकार असलेल्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र मी त्या सगळ्यांना नकार दिला. त्यावेळी मला प्रचंड विरोध सहन करावा लागला. या काळात मला बराच संघर्ष करावा लागला. परंतु, मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी होता, कारण मला महाराष्ट्र आवडतो”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1302814705568813057?s=20
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’