हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहे. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावरूनही ती चर्चेत राहिली. ‘देशाच्या सन्मानासाठी मी नेहमीच आवाज उठवेन’, अशा आशयाचं एक ट्विट कंगनाने केलं होतं. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिला टोला लगावला आहे.‘एक काम कर, तू चार-पाच जणांना घेऊन भारत-चीन सीमेवर लढायला जा’, असा उपरोधिक सल्ला अनुरागने कंगनाला दिला.
काय केलं होतं कंगणाने ट्विट?
‘मी क्षत्रिय आहे. सर कटा सकती हूं, शिरच्छेद करु शकते मात्र नतमस्तक होऊ शकत नाही. देशाच्या सन्मानासाठी मी नेहमी आवाज उठवेन. मान, सन्मान आणि स्वाभिमानासह मी जगतेय आणि गर्वाने राष्ट्रवादी म्हणून जगत राहीन. माझ्या नीतीमूल्यांशी मी कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद!’, असं ट्विट कंगनाने केलं होतं.
कंगनाच्या ट्विटवर अनुराग कश्यपचा सल्ला-
‘फक्त तूच एक आहेस बहीण- एकमेव मणिकर्णिका. चार- पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर जा. त्यांना पण हे दाखवून दे की जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत या देशाचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या घरापासून LAC पर्यंत फक्त एका दिवसाचा प्रवास आहे’, असा उपरोधिक सल्ला अनुरागने कंगनाला दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’