हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शुटिंगला परवानगी देण्यात आली होती. सुरक्षेचे सर्व नियम पाळून चित्रिकरण करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. मात्र शूटिंग दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि सेटवरच्या 27 लोकांनाही कोरोनाने ग्रासलं आहे.
आशालता वाबगावकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’ या मालिकेचं शुटिंग साताऱ्यात सुरू होतं. तिथे सेटवरच्या 27 लोकांनाही कोरोनाने ग्रासलं आहे.दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
आज समोर आलेल्या माहितीनुसार आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होते आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशीही माहिती समोर आली आहे. मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचं शुटिंग करण्यासाठी सुमारे २० ते २२ लोक साताऱ्यातील फलटण येथे गेले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’