हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे आज याच्या ७४ वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बालसुब्रमण्य यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांच निधन झाले आहे. त्यांच्या निधानामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अनेक कलाकारांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील श्रद्धांजली वाहिली आहे.साथिया तूने क्या किया? असे म्हणत भावनिक झालेल्या रितेशने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे बालसुब्रमण्यम यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी करोनावर मात केल्याची माहिती त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी दिली होती. मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’