हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा बॉलीवूड ते हॉलीवूड हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. अलिकडेच प्रियांकाने लिहिलेलं ‘अनफिनिश’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. विशेष म्हणजे हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्याने एक रेकॉर्ड केला आहे.
प्रियांकाचं ‘अनफिनिश’ हे पुस्तक अवघ्या १२ तासांमध्ये ‘बेस्ट सेलर’ ठरलं आहे. याविषयी प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. “केवळ १२ तासांपेक्षा कमी कालवधीत ‘अनफिनिश’ला लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थान दिल्यामुळे मनापासून आभार. मला आशा आहे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल”, असं ट्विट प्रियांकाने केलं आहे.
अनफिनिश’ हे प्रियांकाचं आत्मचरित्र असून यात तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. बॉलिवूडमधील तिचा प्रवास, स्ट्रगल, अफेअर्स, निकवरचं प्रेम आणि हॉलिवूडमधील तिची एण्ट्री या सगळ्यावर तिने प्रकाश टाकल्याचं सांगण्यात येतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’