हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.तमन्ना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळते आहे. यापूर्वी तमन्नाच्या आई-वडिलांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यावेळी तीचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता.
ऑगस्टमध्ये या तमन्नाच्या पालकांना कोरोना झाला होता. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. आता मात्र तमन्नाही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. नमस्ते तेलंंगणाने याबाबत वृत्त दिलं आहे.
यापूर्वी बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता.. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’