हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांचा आज वाढदिवस..बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांच्याकडे पाहिलं जातं. १९९१ साली या दोघांनी लग्न केलं. तेव्हापासून आजतागायत या दोघांनी एकमेकांची कायम साथ दिली आहे. गौरी आणि शाहरुखची लव्हस्टोरी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह स्टोरी आहे. दोघांच्या पहिल्या भेटीपासूनच त्यांचे चाहते त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
शाहरुख खान सुरुवातीला गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता. तिने दुसऱ्या मुलांशी बोलणं, केस मोकळे सोडणं त्याला आवडायचं नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तो गौरीशी भांडू लागला. यामुळे त्रस्त झालेल्या गौरीने त्याच्याशी अबोला धरला आणि काही दिवसांसाठी मैत्रिणींसोबत ती दिल्लीहून मुंबईला आली. शाहरुखला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा गौरीसाठी तोसुद्धा मुंबईला आला. मुंबईतल्या अक्सा बीचवर पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली आणि एकमेकांना पाहताचक्षणी दोघांनाही रडू कोसळलं. त्याच वेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शाहरुख आणि गौरी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालण्यात शाहरुख अखेर यशस्वी झाक आणि गौरीच्या कुटुंबीयांनि त्यांच्या लग्नाला होकार दिला. २५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. २६ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांचं कोर्टात लग्न झालं. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचं नाव आयशा ठेवण्यात आलं होतं.
१९९७ मध्ये गौरीने आर्यनला जन्म दिला आणि त्यानंतर २००० मध्ये शाहरुख- गौरीच्या आयुष्यात सुहानाचं आगमन झालं. वैवाहिक आयुष्यात दोघांनी बरेच चढउतार पाहिले, मात्र त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’