हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज निधन झालं आहे. सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठी सिनेसृष्टीत 90 च्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचीत होते. अविनाश खर्शीकर यांनी १९७८ ला बंदिवान मी या संसारी या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक चित्रपट त्यांनी केले.
दरम्यान, अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’