हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी उत्सव हंगाम आणि थंड हवामान लक्षात घेऊन कोरोनाविरूद्ध जनआंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत शिथिलता नाही अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदींच्या याच गोष्टीला सुपरस्टार सलमान खाननेही पाठिंबा दर्शविला आहे.
सलमान खान यांनी ट्विट केले, “बंधूनो, भगिनींनो आणि मित्रांनो. या कठीण काळात फक्त तीन गोष्टी करा. 6 फूट अंतर पाळा, मास्क घाला आणि सॅनिटायजरनर आपले हात धुवत रहा. चला पंतप्रधान मोदींच्या कोरोनाविरूद्धच्या जनआंदोलन पालन आपण करूया. कमॉन इंडिया. जय हिंद. ” सलमानने ट्वीट ला #UniteToFightCorona हा हॅश टॅग दिला आहे.
सुपरस्टार सलमान खानच्या या ट्विटला लाखो लोकांनी लाईक केलं असून हजारो लोकांनी त्यास रिट्वीट केले आहे. गुरुवारी पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की कोरोना लढण्यासाठी एकत्र येऊया! नेहमी लक्षात ठेवा, मास्क घाला, सॅनिटायजरने हात स्वच्छ करा आणि सोशल डिस्टन्स पाळा “# युनिट 2 फाइट कोरोना
देशात जशी जशी शिथिलता दिली जात आहे तसे तसे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असुन भारतासाठी ही खूप मोठी चिंतेची बाब आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’