हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. त्यासोबतच तिची अभिनेत्री ऋचा चड्ढाला देखील या प्रकरणात ओढलं होत.त्यामुळे रिचा चड्डा आणि पायल मधील सोशल मीडियावर सुरु असलेली कॅट फाईट खूप व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत पायलने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.
पायलने एका ट्विटद्वारे पीएम मोदींकडे मदत मागितली आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, “ही माफिया गँग माझी हत्या करेल आणि वरुन ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं सिद्ध करतील”. पायलने या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांना टॅग केलं आहे.
पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात ऋचा चड्ढा हिचं नावही घेतलं आहे. त्यामुळे ऋचाने पायलविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर पायलचे वकील नितीन सातपुते म्हणाले की, “याप्रकरणी पायल ऋचा चड्ढाची माफी मागणार आहे”.
काय होते अनुरागवर आरोप-
अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’