हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड कलाकारांची मुले आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलीवूड मध्येच काम करताना आपण बघितलं आहे. श्रद्धा कपूर, सोनम कपूर, रणवीर कपूर अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे जुनैद खान. बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक स्टारकिडचं पदार्पण झालं. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या मुलाच्या बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पुर्ण होणार आहे. जुनैद देखील येत्या काही काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जुनैद ‘इश्क’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिकेममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाची पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.
जुनैदला अभिनयाची प्रचंड आहे. सध्या तो जर्मनीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. विशेषत: त्याला चित्रपटांऐवजी रंगभूमीवर काम करण्यात अधिक रस आहे. अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटात त्याने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’