हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आपल्या जबरदस्त अभिनयाने बॉलिवूड कलाविश्वात नाव कमवनारा मेहनती अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी…परंतु तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या सिनेमांऐवजी पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप लावत घटस्फोटाची मागणी केली होती. यादरम्यान नवाजचा ‘सीरिअस मॅन’ सिनेमा रिलीज झाला होता. अशात कंगनाने बॉलिवूडचं नाव बदललं पाहिजे अस मत व्यक्त केले होते. आता नवाजुद्दीन सिद्दीकीनेही कंगणाच्या सुरात सूर मिसळला आहे. नवाजुद्दीन म्हणाला की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीला आताही आपल्या कामाची मान्यता परदेशातून हवी असते आणि त्यामुळेच इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूड हे बदललं पाहिजे.
हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना नवाजुद्दीन म्हणाला की,बॉलीवूड हे उधारीवर ठेवलेलं नाव आहे त्यामुळे माझीही इच्छा आहे की एक गोष्ट बदलली गेली पाहिजे सर्वातआधी आपल्याला ते बदललं पाहिजे’. याआधी कंगनाने ट्विटवर पोस्ट टाकून म्हणाली होती की, इंडस्ट्रीचं बॉलिवूड हे नाव बदललं पाहिजे. कारण ते हॉलिवूडचं कॉपी आहे आणि याच्या वापरावर बॅन केलं पाहिजे.
नवाजुद्दीनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सीरिअर मॅन’मधील त्याच्या कामाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलंच कौतुक केलंय. नवाज म्हणतो की, बरं झालं हा सिनेमा लोकांना आवडला नाही तर इथे एखाद्या सिनेमाला बाहेर अवॉर्ड मिळाला तरच लोक म्हणतात की, चांगलं काम केलं आहे. नवाज म्हणाला की, भारतातील लोकांना आजही आपल्या कामावर परदेशी मान्यता हवी आहे आणि हे बाब अजूनपर्यंत बदलली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’