हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.प्रथम या चित्रपटातील अक्षय कुमारच्या भूमिकेचं असिफ हे नाव वादग्रस्त ठरलं .या नावामुळे हा चित्रपट लव्ह जिहादला समर्थन देत असा आरोप करण्यात आला.त्यांनतर चित्रपटाच्या टायटल वरूनही गोंधळ निर्माण झाला. त्यातच आता अभिनेते मुकेश खन्ना यांनीही चित्रपटाच्या नावावरून टीका केली आहे.
नक्की काय म्हणाले मुकेश खन्ना??
‘लक्ष्मी बॉम्ब या नावाने कोणताही सिनेमा रिलीज व्हायला हवा? यावर देशभर वादविवाद सुरु आहे. काही लोक हा सिनेमा बॅन करण्याची मागणी करत आहेत. मला विचाराल तर बॅन योग्य नाही. कारण अद्याप कोणीच सिनेमा पाहिलेला नाही. केवळ ट्रेलर पाहिला आहे. मात्र फक्त टायटलची गोष्ट केलीच तर लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब जोडणे खोडसाळपणा आहे. कमर्शिअल इंटरेस्ट हाच एक विचार यामागे असल्याचे वाटते. चित्रपटाच्या या नावाला परवानगी द्यायला हवी? तर कदापि नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीसस असे शीर्षक ठेऊ शकता? नाही ना, मग लक्ष्मी बॉम्ब टायटल कसे चालणार? असे वाद निर्माण व्हावे, त्यावरून चर्चा व्हावी यासाठीच असा धूर्तपणा केला जातो. हे असेच होते आणि होत राहील. मात्र कधीतरी हे थांबवावे लागेल आणि हे केवळ जनताच थांबवू शकते. या व्यावसायिक लोकांमध्ये जराही हिंदूंची भीती नाही. दुस-या धर्मासोबत असा पंगा घेऊन दाखवा, तलवारी निघतील. म्हणून अन्य धर्माशी हे लोक पंगा घेत नाही. हिंदू धर्म मात्र यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. प्रत्येक निर्माता आपला सिनेमा हिट करू इच्छितो, त्यासाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केल… अस मुकेश खन्ना म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’