हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | ब्युटी विथ ब्रेन अशी ओळख असणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज 47 वा वाढदिवस आहे. ऐश्वर्या राय ही नेहमीच मोहक सौंदर्य, प्रतिभा आणि शानदार अभिनयासाठी ओळखली जाते. आज वाढदिवसाच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या एश्वर्याबाबत काही खास गोष्टी सांगत आहोत.
एश्वर्याला सुरवातीला वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवायचे होते. तथापि,नंतर तिने हा विचार सोडला आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्यासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. पण नंतर मॉडेलिंगसाठी आपले शिक्षण सोडले.
त्यानंतर तिनं स्वत:च्या मनमोहक सौंदर्यानं आणि कसदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष जागा बनवली. वयाच्या अवघ्या 21 वर्षी म्हणजेच 1994 मध्ये तिनं मिस वर्ल्डचा किताब जिंकला.
२००६ मध्ये जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश भारत दौर्यावर आले होते तेव्हा ऐश्वर्याला जेवणासाठी अमंत्रित केले होते.परंतु,अॅश या कार्यक्रमाला हजर राहिली नव्हती.
ऐश्वर्या आणि प्रियंका चोप्राचं एकमेकींशी पटत नाही असं म्हणतात. ‘ब्लफ मास्टर’ चित्रपटात ऐश्वर्याऐवजी प्रियांकाची निवड करण्यात आली. तसेच यानंतर ‘राम लीला’ या चित्रपटतील ‘राम चाहे लीला चाहे’ या आयटम साँगवर देखील एश्वर्याऐवजी प्रियंकाची निवड झाली.
बर्याच लोकांना हे माहिती नाही की, नेदरलँडमधील केऊकेनहॉफ गार्डनने आपल्या ट्युलिप्सचं नाव ऐश्वर्या रायच्या नावावरुन ठेवल आहे.ऐश्वर्याशी संबंधित एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे जगभरातील १०,००० पेक्षा जास्त वेबसाइट्स पूर्णपणे या सौंदर्यवान अभिनेत्रीला समर्पित आहेत. मात्र, ऐश्वर्याची अधिकृत वेबसाइट एकच आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’