हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आपल्या अथक परिश्रमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलेला आणि बॉलीवूड मध्ये टॅलेंटेड अभिनेता म्हणून गणला जाणार अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यानं सर्वतोपरी न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे. कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असणाऱ्या नवाजनं आपण काही चित्रपट हे निव्वळ पैशांसाठीच केल्याची कबुलीही दिली. ‘हो, मी पैशांसाठी चित्रपट केले आणि यापुढंही करेन. मी असेही काही चित्रपट केले आहेत जेथे मला चांगले पैसे मिळाले. पण, मी असेही काही चांगले चित्रपट करेन जेथे मला जास्त पैसे मिळणार नाहीत किंवा मी ते चित्रपट मोफतही करेन असे ते म्हणाले.
अभिनय हा अभिनयच असतो. वृक्षावर चढून करा किंवा रस्त्याच्या एखाद्या नाक्यावर नाटक करा, चांगला अभिनेता हा कुठेही चांगलाच किंबहुना उत्तमच असतो. आपल्याला चित्रपटांच्या माध्यमातून ही कला आणखी खुलवता येते त्यामुळं हे माध्यमच सर्वाच आवडीचं हेसुग्धा त्यानं न चुकता सांगितले.
सरफरोश’ या चित्रपटामध्ये मिळालेली एखादी लहानशी भूमिका असो किंवा मग तलाश या चित्रपटातील ‘तैमूर’ असो. नवाजनं कायमच मोठ्या सातत्यानं त्याचं वेगळेपण सिद्ध केलं. अगदी हलक्याफुलक्या चित्रपटांमध्येही तो झळकला. ठाकरे’, ‘कहानी’, ‘किक’, ‘मंटो’ अशा बहुरंगी चित्रपटांमध्ये कथानकाला तितकंच महत्त्व देत त्याने जबरदस्त काम केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’