हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी या आंदोलनावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. रितेश देशमुखनेही शेतकऱ्यांचं समर्थन करणार ट्वीट यावेळी केलं आहे.
शनिवारी रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, ‘जर तुम्ही आज जेवत असाल तर त्याबद्दल शेतकर्याचे आभार माना. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसोबत एकजुटने उभा आहे.’ दरम्यान, बॉलिवूड आणि पंजाब सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध केंद्र सरकारला इशारा दिला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’