हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाउनच्या काळात गरीब लोकांच्या मदतीला धावून आला होता. चित्रपट सृष्टीत खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र हिरो ठरला. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना नोकरी देण्यातही सोनुने महत्त्वाची भूमिका निभावली. सध्या सोनू एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री कंगना रानौतवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
बॉलिवूडमधील 99 टक्के लोक मादक पदार्थांचे सेवन करतात.’ कंगनाच्या या वक्तव्यावर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘मला या गोष्टीमुळे अत्यंत दुःख झालं आहे. जेव्हा बॉलिवूडमधील लोकच बॉलिवूडविषयी काही वाईट बोलतात तेव्हा भावना दुखावल्या जातात.’ असं सोनू म्हणाला.
इंडस्ट्रीमध्ये आम्ही सर्व एक कुटुंब आहोत असं म्हणत सोनू म्हणाला या इंडस्ट्रीमध्ये अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. बॉलिवूडने अनेकांना नाव, समृद्धी मिळवून दिली आहे. ऐकेकाळी सोनू आणि कंगना चांगले मित्र होते. मात्र 2018 पासून त्यांच्यात वाद सुरू आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post