हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि अनेक गोष्टींवर आपलं मत परखडपणे मांडत असते. आता तर तिने थेट ट्विटरच्या सीईओवर आगपाखड करत आपला राग व्यक्त केला आहे. अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. अलिकडेच ट्विटरने अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई करत यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद केलं आहे. यामुळेच कंगणाने थेट ट्विटरच्या सीईओनाच खडेबोल सुनावलं आहेत.
कंगना रणौतने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी वर आपला राग काढला आहे. यावेळी कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये जॅक डोर्सीचं 2015 साली केलेल्या एका ट्वीटला क्वोट केलं आहे. ज्यात त्यानं लिहिलं होतं की – ‘ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. सत्तेच्या विरोधात खरं बोलणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. परस्पर संवाद मजबूत करण्याला आम्ही पाठिंबा देतो.’
https://twitter.com/KanganaTeam/status/1348075584937668610?s=20
कंगनाने या ट्विटला क्वोट करत लिहिलं की- ‘तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत नाहीत, इस्लामिक देशांनी आणि चिनी प्रोपगंडासोबत तुम्ही पूर्णपणे विकले गेले आहात. तुम्ही फक्त आपल्या फायद्याच्या बाजूने उभे आहात. तुम्ही इतरांच्या मतांबद्दल असहिष्णुता दर्शवत आहात. तुम्ही तुमच्या लोभांचे गुलाम झाले आहात. त्यामुळं केवळ मोठं मोठे दावे करू नका, हे खूप लज्जास्पद आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post