हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरातील नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही मातोंडकर यांनी वंदन केलं. बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूडमध्ये आम्ही सुरक्षित होतो असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
आज मी शिवसेनेचा भाग आहे म्हणून इथं आले असले तरी बाळासाहेबांबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्तुती केली. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी ज्यापद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी संयम दाखवला तो कौतुकास्पद होता. असे नेते एकंदर देशातच खूप कमी आहेत आणि त्यातले सर्वात महत्वाचे नेते हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post