हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा पॉलिटिकल चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसेल. कंगनाने अद्याप या चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही. मात्र, हा चित्रपट इंदिरा गांधींची बायोपिक नसेल, तसेच या चित्रपटात अनेक मोठे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील, असे तिने म्हटले आहे.
कंगना व्यतिरिक्त या सिनेमात इतर अनेक आघाडीचे कलाकार काम करताना दिसतील. कंगनाने अलीकडेच जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलाईवी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय कंगनाने ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. तसेच अलीकडेच कंगनाने ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिड्डा’ आणि ‘अपराजिता अयोध्या’ नावाच्या चित्रपटांची घोषणा देखील केली.
इंदिरा गांधी यांच्या भूमिकेविषयी कंगना म्हणाली की, हो, आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत आणि या चित्रपटाची स्क्रिप्ट लवकरच पूर्ण होईल. हा चित्रपट इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसेल. मात्र आजकालच्या पिढीला देशातील सद्य सामाजिक-राजकीय परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणारा भव्य चित्रपट असेल. कंगनाने पुढे म्हटलं की, आणखी बरेच नामांकित कलाकार या चित्रपटात काम करतील आणि इंदिरा गांधी म्हणून मी भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप उत्साही आहे.
कंगना म्हणाली, मी भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिकल लीडरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका पुस्तकावर आधारलेला आहे. मात्र, तिने या पुस्तकाचे नाव सांगितलेले नाही. या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील दोन मोठे निर्णय आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टारदेखील दर्शविले जाणार आहेत.
कंगनासोबत पूर्वी काम केलेले डायरेक्टर साई कबीर, हे या चित्रपटाचेही दिग्दर्शन करतील. याच बरोबर त्यांनी स्क्रिप्टदेखील लिहिली आहे. हा चित्रपट ग्रँड लेवलवर तयार होणार आहे. यात संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्रींसारख्या अनेक नेत्यांच्या भूमिका आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post