हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या वेधडक वृत्तीमुळे आणि काही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. देशातील कृषी कायद्याच्या वादात देखील तिने उडी घेत आंदोलक शेतकऱ्यांना खडेबोल सुनावलं होते. यानंतर अनेक कलाकारांनी तिच्यावर निशाणाही साधला. आता कंगनाने पुन्हा एकदा तिच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कंगनानं नुकतंच महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या समर्थनात एक ट्विट केलं आहे. शहीद दिन म्हणजेच 30 जानेवारीला तिनं हे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं नथुराम गोडसे (NathuramGodse) यांचं समर्थन करत लिहिलं, की ‘प्रत्येक गोष्टीच्या 3 बाजू असतात. एक तुमची, एक माझी आणि एक खरी. चांगली गोष्ट सांगणारा कधीच बांधला गेलेला नसतो आणि तो कधीच काही लपवतही नाही. त्यामुळे, आपली सगळी पुस्तके चुकीची असून तो फक्त दिखावा आहे, #NathuramGodse’ असं कंगनानं म्हटलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1355483992477335555?s=20
पुस्तकांमध्ये जो इतिहास सांगितला गेला आहे, त्यात बऱ्याच गोष्टी लपवल्या गेल्या आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे. खरं तर कंगनाने यापूर्वी देखील देशातील अनेक गोष्टींवर परखडपणे आपलं मत मांडलं आहे. त्यामुळे कधी कधी काही लोक तिची वाहवा करतात तर अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post