हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सध्या देशात आणि राज्यात पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडलं आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीमुळे केंद्र सरकारला रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रसनेही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुपरस्टार अक्षय कुमार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली आहे.
युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारं सरकार होतं म्हणून 70 रुपये लि.पेट्रोल झालं होतं. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली, मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही?, असं म्हणत नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासह इतर सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.
युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते म्हणून ७० रुपये लि.पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते @SrBachchan, @akshaykumar, इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.
आता पेट्रोलने शंभरी गाठली, मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही?— Nana Patole (@NANA_PATOLE) February 17, 2021
सध्या पेट्रोल प्रति लिटर 96 रुपये तर डिझेल 86 रुपये लिटर झालं आहे तर घरगुती गॅस सिलेंडर 800 रुपये झाला आहे. कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणं कठीण झालं आहे. त्यात दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली असून सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post