हॅलो बॉलीवूड ऑनलाइन |बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमीला (Emraan Hashmi) सीरियल किसर म्हणून ओळखलं जातं. त्याने सुरुवातीला बर्याच चित्रपटांत बोल्ड किसिंग सीन (Bold Kissing Scene) देवून मोठ्या पडद्यावर खळबळ उडवली होती. असं असलं तरी इमरानने गेल्या काही काळापासून स्वत: ची ही प्रतिमा पुसायला सुरुवात केली आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इमरानने काम झाल्यानंतर इंडस्ट्रीपासून लांब राहण्यामागचे कारण सांगितले आहे. दरम्यान त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला फेक असे ही म्हटले आहे.
इमरानने रेडीओ होस्ट सिद्धार्थ खन्नाला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूड इंडस्ट्री फेक आहे असे म्हणत सांगितलं की, ‘जेव्हापासून बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हापासून त्याने स्वतः साठी काही नियम बनवले आहेत. इमरान म्हणाला की, बॉलीवूडमधील लोकं नेहमीच तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात, परंतु तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात. त्यामुळे बॉलीवूडमध्ये कोण बरोबर आणि कोण चुकीचं ? हे शोधणं फार कठीण आहे.
पुढे तो म्हणाला, ‘मी माझे १०० टक्के देऊन काम करतो आणि कशा पद्धतीने माझे काम आणखी चांगले होईल याकडे माझा कल असतो. मी बॉलिवूडमधील लोकांशी कामाशी काम ठेवतो. मला माझ्या इंडस्ट्री बाहेरील मित्र परिवारासोबत वेळ घालवायला आवडतो.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post