हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून वांझे यांच्या अटकेनंतर राज्यातील वातावरण तापलं असताना आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने यात उडी घेतली असून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे. जय हिंद. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं सचिन वाझे प्रकरणी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1370965964381159425?s=20
कंगणाने यापूर्वी देखील शिवसेनेवर निशाणा साधला होता. मुंबई महापालिकेने कंगनाचे अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर कंगना अजून आक्रमक झाली होती. तीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.
Discussion about this post