हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकारमंडळी प्रचंड सक्रीय असतात. वेळोवेळी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करीत असतात. खरतर कलाकार ते साकारत असलेल्या भूमिका रसिकांना आवडतात कि नाही याचा अंदाज सोशल मीडियावरील प्रतिक्रियांतून सहज समजत असतो. मात्र कित्येकदा या सोशल मिडीयावरील काही युजर मर्यादेचे भान न राखता कमेंट्स करीत असतात आणि याचा नाहक त्रास कलाकारांना होतो. असाच काहीसा प्रकार शशांक केतकर या अभिनेत्यासोबत घडला आहे. एका युजरने शशांकच्या पोस्टवर असभ्य भाषेतील प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शशांकचा पारा चांगलाच वाढला व त्याने कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल अशी कमेंट करीत नेटकऱ्यास चांगलीच फटकार लगावली.
सध्या कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल करणे हा ट्रेंड झाला आहे. एखाद्या आवडत्या कलाकाराने नकारात्मक वा खलनायकी भूमिका साकारल्यास प्रेक्षकांना ती रुचत नाही आणि मग काय? त्या कलाकारांस कोणत्याही भाषेची तमा न बाळगता ट्रोल केले जाते. शशांक केतकर हा प्रचंड चाहते असणारा नट असून त्याच्या सोशल अकाउंटवर त्याचे अनेको फॉलोवर्स आहेत. सध्या तो झी मराठीवरील पहिले ना मी तुला या मालिकेत समर नामक नकारात्मक भूमिका साकारत आहे. अगदी रसिकांनी कल्पनाही केली नसेल, अशा भूमिकेत शशांक या मालिकेत झळकत आहे.
आत्तापर्यंत नायकाच्या भूमिकेत दिसणारा शशांक या मालिकेतून पहिल्यांदाच खलनायक म्हणून रसिकांच्या भेटीला आला आहे. आपली ही भूमिका रसिक कसे स्वीकारणार, याबाबत शशांक जरा साशंक होताच. त्यामुळे सुरुवातीलाच आता मला शिव्या खाव्या लागणार, असे त्याने म्हटले होते.
नुकताच शशांक सोशल मीडियावर लाईव्ह आला होता. तेव्हा आपल्या चाहत्यांसह त्याने संवाद साधला. त्या दरम्यान एका युजरने असभ्य भाषेत त्याला कमेंट केली. यावरच शशांक संतापला. कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल असे म्हणत टीका करणा-या युजरला शशांकने चांगलेच खडे बोल सुनावले. त्यानंतर दोघांचा वाद वाढतच गेला. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिऍक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, या गोष्टीला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे आणि —— वगैरे शब्द वापरून व्यक्त होणं एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान १५ जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून, वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि रसिकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. त्यासाठीच तर ही मालिका आहे” अशा शब्दात शशांकने त्याला खडसावलं.
‘माझ्या मते, शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून टीव्हीवर फार कमी वेळी प्रयोग करायला मिळतात,’ असे त्याने लिहिले होते. शिवाय या ‘खतरनाक’ संधीसाठी झी, कोठारे व्हिजन, आदित्यनाथ कोठारे, उर्मिला कोठारे यांचे आभार…, असेही त्याने म्हटले होते.
Discussion about this post