हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनीचा ठाव घेत असतात. बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असताना, काही जुन्या मालिका निरोप घेत असतात. दररोज पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमधील पात्रे लोकांना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अमूल्य भाग वाटू लागले असता, त्यांचा निरोप पचविणे जरा जड वाटते. अशीच एक प्रसिद्ध व लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जीव झाला येडापीसा हि आज(३ एप्रिल २०२१ रोजी) प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेचे लेखक आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी खास पोस्ट लिहीत आपल्या भावना प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CNMuhttpVXo/?utm_source=ig_web_copy_link
‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी तसेच त्यांची जोडीही प्रेक्षकांना अतिशय भावली. मात्र, हा प्रवास आता संपतोय आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
मालिकेचे निरोप घेणे जवळ येताच लेखक-अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी खास पोस्ट लिहित आपल्या भावनांना स्पष्ट रूपात मोकळ्या केल्या आहेत. शिवा आणि सिद्धीचा एक फोटो पोस्ट करीत त्यांनी लिहिले, ‘५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन जीव झाला येडापिसाचा प्रवास आज थांबतो आहे. माझ्या काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका. पुराशी, कोविडशी लढली. कले कलेनं वाढली. 5 भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास थांबेल. कधी थांबणार? पेक्षा का थांबलात? हा प्रश्न कधीही गोड वाटतो. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार. विनोद लव्हेकर, निखील शेठ, कल्याणी पाठारे, दीपा तेली, विशाल उपासनी, संग्राम दत्ता, तुषार जोशी, प्राची कदम तुम्ही जे दिलंत त्यासाठी भरपूर प्रेम आणि आभार. आणि मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा. खूप खूप आभार दीपक राज्याध्यक्ष तू दाखवलेल्या विश्वासाबद्दल. आणि मनापासून आभार शिवा, सिद्धी, जलवा, सोनी, आत्याबाई, सरकार आणि संपूर्ण रुद्रायतच्या जगावर प्रेम करणार्या रसिकांचे’.
https://www.instagram.com/p/CDMTJZKBaC6/?utm_source=ig_web_copy_link
‘जीव झाला येडापिसा’ ह्या मालिकेने ५३५ भागांचा टप्पा पार करीत, प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि आता निरोपाच्या वाटेकडे सरावली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडी प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती. अभिनेता अशोक फळदेसाई या मालिकेत शिवाची भूमिका साकारताना दिसला , तर अभिनेत्री विदुला चौगुले सिद्धीच्या भूमिकेत दिसली. या कलाकारांना या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं आणि त्यांचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे.
Discussion about this post