हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबई येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांचे सिनेसृष्टीत मोठे योगदान होते. १०० हुन अधिक चित्रपटांत आपली छाप पाडणाऱ्या शशिकला यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कुलाबा येथील चर्चमध्ये शोकसभा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Veteran actress #Shashikala passes away at her residence. Our condolences are with the family. #RIPShashikala pic.twitter.com/MLyLd1lNxE
— Filmfare (@filmfare) April 4, 2021
सोलापुर येथील एका साधन कुटुंबात जन्मलेल्या शशिकला यांचे बालपण श्रीमंतीत लोटले. बालपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयाची विशेष आवड होती. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिला ओमप्रकाश सैगल झाल्या. १९४७ साली प्रदर्शित झालेल्या ‘जुगनू’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली होती. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना अतोनात संघर्ष करावा लागला. त्यानंतर १९६२ साली आरती चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढून या भूमिकेसाठी तयार केले.
RIP Shashikala-ji. 🙏🏽 Condolences to the family. pic.twitter.com/YCkHSPrHtq
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) April 4, 2021
आरती चित्रपटात साकारलेली खलनायिका प्रेक्षकांना भाळली आणि शशिकला यांच्या चित्रपट सृष्टीतील नव्या प्रवासाला सुरुवात झाली. फिल्मफेअरसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांनी पटकाविले. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात त्यांनी खलनायिकेच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
An actor par excellence, one of the greats of the golden era… she leaves behind an indelible mark on cinema. Honoured to have had the opportunity to work with her. Om Shanti #Shashikala ji pic.twitter.com/T1eQXptCyF
— PRIYANKA (@priyankachopra) April 4, 2021
Discussion about this post