हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. ६ एप्रिलपासून राज्यात मतदानाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम (MMM) या राजकीय पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी एक विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी एक उत्तम माध्यम आहे आणि जनतेची सेवा करताना जर चित्रपटांचा अडसर होत असेल, तर ते सिनेसृष्टीतून कायमची निवृत्ती घ्यायला तयार आहेत. या विधानामुळे त्यांचे चाहते संभ्रमात पडले आहेत.
कमल हसन यांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात ते म्हणाले, मी देशातील त्या ३० टक्के लोकांपैकी एक होतो जे राजकारणापासून पुर्णपणे अलिप्त राहतात. मात्र परिस्थितीने मला राजकारणात येण्यास भाग पाडले. आता मी माझे संपूर्ण लक्ष जनतेच्या सेवेसाठी केंद्रित करणार आहे. जर हे काम करत असताना माझे सिने करिअर अडसर ठरत असेल तर मी सिनेइंडस्ट्री कायमची सोडून द्यायला तयार आहे. ते पुढे म्हणाले की, माझे विरोधक म्हणत आहेत, की हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. काही दिवसांनी मी राजकारणातून गायब होईन.आता लोक ठरवतील कोणाला गायब करायचे ते.
कलम हसन यांच्या या विधानमुळे चाहते अवाक् झाले असून तामिळनाडूतील हि विधानसभा निवडणूक जोरदार होणार याची चिन्हे दिसत आहेत. कमल हसन कोईम्बतूर साऊथ वेस्ट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आजपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी एक नट म्हणून त्यांच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. मात्र आता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आपल्या चाहत्यांची गरज आहे. अश्यावेळी त्यांचे चाहते काय भूमिका निभावतात हे काय ते महत्वाचे.
Discussion about this post