हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेसृष्टीत कॉमेडी ते गँगस्टर अशा नानाविध भूमिकांमुळे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आपला खास प्रेक्षकवर्ग बनवला आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सुल्तान ते ‘मिर्झापूर’मधील कालीन भैय्या अशा भूमिका त्यांनी जिवंत साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र आज ते आऊट सादर असल्याची खंत वाटते असे म्हणत आहेत.
https://www.instagram.com/p/CNSCAROpWkc/?utm_source=ig_web_copy_link
गेल्या १० वर्षांमध्ये पंकज त्रिपाठी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले असले, तरी हि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष गेली कित्येक वर्ष सुरू होता. सुरुवातीला एक-दोन मिनिटांचा रोलही नशिबाने मिळणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर रुपेरी पडदा गाजवला. मात्र सहज, सुंदर आणि प्रेक्षकांच्या मनाला भावणारा अभिनय करणारे पंकज त्रिपाठी एक आउटसाइडर असल्याचे दु:ख जाणतात. याबाबत असणारी मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
पंकज त्रिपाठी यांनी मोठ्या पडद्यावर कॉमेडी ते वास्तवदर्शी अश्या विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘फुकरे’ आणि ‘स्त्री’ या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या कॉमेडी भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या. तसेच ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ ते ‘मसान’ यांमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही चाहत्यांना भावली. मात्र एका आउडसाइडरला यशस्वी होणे इंडस्ट्रीमध्ये खूप आव्हानात्मक आहे, असे पंकज त्रिपाठी म्हणतात.
‘हे खरे आहे की इंडस्ट्रीमध्ये नवीन कलाकारांसाठी संघर्ष पाचवीचा पुजलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील किंवा कोणी गॉडफादर असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु एका आउटसाइडरचा इंडस्ट्रीतील प्रवास काट्यावर चालण्यासारखाच आहे. त्यात तुम्ही जर गावावरून आलेले असाल आणि हिंदी मीडियममध्ये शिक्षण घेतले असेल, तर तुमचा टिकाव लागणे खूपच अवघड असते’, असे पंकज त्रिपाठी यांनी म्हटले आहे. पंकज त्रिपाठी हे मूळ बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते पटनाला आले. येथे त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि हॉटेलमध्ये काम सुरू केले. मात्र त्यांच्यातील कलाकार त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथेच कलेचे धडे त्यांनी गिरवले आणि आज एका लहान गावापासून शहरापर्यंतचा हा प्रवास प्रेरणादायी प्रवासांपैकी एक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Discussion about this post