हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल अनेक कलाकार आपल्या लहानपणीचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. असाच एक फोटो नुकताच सोशल मीडियावर वायरल होतोय. हि चिमुरडी नक्की कोण असा प्रश्न साऱ्यांना पडला असेल. हि चिमुरडी आता मोठी झाली असून छोट्या पडद्यावरील एका बहुचर्चित मालिकेत काम करतेय. आता तरी ओळखलंत का ? नाही? अहो झी मराठीवर सुरु असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर आहे हि चिमुरडी. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकताच तिने बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
अन्विता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात येत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. नुकतेच अन्विताने इंस्टाग्रामवर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप क्युट दिसत आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
याआधी तिने मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. नंतर २०१९ मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विताने ‘रुमी’ ही भूमिका साकारली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केले होते. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केले होते.
Discussion about this post