Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा’, मराठी अभिनेत्याने केले ट्विट; कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2021
in बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Sandeep Pathak
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचा वाढता संसर्ग म्हणजे, डोक्यावर जणू टांगती तलवारच. कोरोनामुळे आतापर्यंत कित्येकांचा मृत्यू झाल्याचे आपण पाहत आहोत. दरम्यान कोरोना लस हि एकमात्र आशा लोकांना धीर देत होती. मात्र अश्यावेळी महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा पडल्यामुळे पुन्हा एकदा लॉक डाऊन च्या निर्णयाकडे वळणे हा एकमेव मार्ग शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जनमानसात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या राज्य सरकार केंद्र सरकारकडे कोरोना लसींची मागणी करत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापले आहे. पण ‘कोरोना लसीसारख्या गोष्टीवर राजकारण करू नका’, असे म्हणत अभिनेता संदीप पाठकने सोशल मीडियावर एक परखड ट्वीट केले आहे.

देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना इतर राज्यांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणात का? पक्ष, राजकारण ह्यांच्या वादात सामान्य माणूस कोरोनाग्रस्त होतोय.आपण माणसाच्या जीवाशी खेळतोय ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी असु द्यावं.#Covaxin

— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) April 9, 2021

संदीप पाठक हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. संदीपने असे ट्वीट केले आहे की, देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना, इतर राज्यांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणात का? पक्ष, राजकारण ह्यांच्या वादात सामान्य माणूस कोरोनाग्रस्त होतोय. आपण माणसाच्या जीवाशी खेळतोय ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी असु द्यावं… यासोबत त्याने #MaharashtraNeedsVaccine असे देखील आणखी एक ट्वीट केले आहे. संदीपचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. तर संदीपचे मत योग्यच आहे असे नेटिझन्स त्याला सोशल मीडियावरून सांगत आहेत. परखडपणे आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद… आजकाल काहींना हे देखील जमत नाही…. असे म्हणत एकाने या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.

@mesandeeppathak जी आपण परखडपणे अवाज उठवल्याबद्दल धन्यवाद!
काहींना ते सुद्धा जमत नाही….#MaharashtraNeedsVaccine

— Mayur Sawant (@SawantMV) April 9, 2021

मराठी अभिनेता संदीप पाठक याने आजपर्यंत अनेक मराठी चित्रपट तर नाटके गाजवली आहेत. आपल्या कॉमेडी अभिनयाच्या जोरावर त्याने आपला वेगळा असा चाहत्यांचा वर्ग तयार केला आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ ह्या एकपात्री नाटकाचे प्रयोग आता अभिनेता संदीप पाठक करीत आहे. या नाटकात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५२ पात्रे तो यशस्वीरीत्या साकारतो आहे.

Tags: covid19Maharashtra Needs Vaccinemarathi actorSandeep PathaktrendingTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group