हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. सद्य स्थिती पाहता महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय निवडावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. त्याचसोबत कलाकारांना सुद्धा कोरोनाचा जबर फटका बसलेला आहे. दररोज एक तरी कलाकार कोरोना बाधित होतोय. त्यामुळे कलाकारांकडून खबरदारी वाढविण्यात आलेली आहे. प्रत्येक कलाकार आपापल्या परीने आपली व प्रियजनांची काळजी घेत आहे. मराठी मालिका ‘काय घडलं त्या रात्री?’ च्या सेटवरचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. माझा मास्क, माझी जबाबदारी असे म्हणत कलाकार जनजागृती संदेश देताना दिसत आहेत.
झी मराठीवर प्रक्षेपित होणारी मालिका ‘काय घडलं त्या रात्री? च्या सेटवरचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. तसेच यातील कलाकारांचे कौतुक सुद्धा होत आहे. या व्हिडीओमध्ये एका दृश्याचं चित्रीकरण करताना दाखविण्यात आले आहे. कुठलाही सीन देताना त्यापूर्वीचे काय सोपस्कार असतात हे यातून दिसेल. कलाकारांना पहिल्यांदा सॅनिटायझर देण्यात येते. त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराच्या तोंडाला मास्क सुद्धा दिसत आहे. या व्हिडीओवर #माझा सेट #माझी जबाबदारी, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा यांसारख्या सूचनासुद्धा झळकत आहेत. व्हिडीओच्या शेवटी हे कलाकारसुद्धा हाच संदेश देताना दिसतं आहेत.
सध्या कलाकारांच्या भोवताली देखील कोरोनाचे जाळे घट्ट होत आहे. एखाद्या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्यानंतर मालिकेच्या संपूर्ण टीमला सुद्धा धोका उद्भवतो. त्यामुळे चित्रिकरणादरम्यान कलाकारांकडून, सेटवरील कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालिका असो किंवा चित्रपट यांचे चित्रीकरण काही दिवसांसाठी थांबवण्यात येत आहे. तसेच तात्काळ इतर कलाकार, करू मेम्बर साऱ्यांची कोरोना चाचणी देखील केली जात आहे. त्यामुळे ‘काय घडलं त्या रात्री? मालिकेच्या सेटवर योग्य ती खबरदारी घेण्यात येतं आहे. सोबतच सर्वांना जागृत देखील करण्यात येतं आहे.
Discussion about this post