हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त डॅनिअलने पत्नी सनीला महागडा डायमंडचा हार गिफ्ट म्हणून दिला आहे. सनीने सोशल मीडियावर हार घालून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच पतीला थँक्यू सुद्धा म्हटले आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. गिफ्ट म्हणून मिळालेला हार घालून व्हिडिओ पोस्ट करताना सनी लिओनीने लिहिले की, ‘खूप खूप आभार डॅनिअल लग्नाच्या वाढदिवसाला हिऱ्याचा हार दिल्याबद्दल. हे खरोखर एक स्वप्न आहे. लग्नाला १० वर्षे झाली आहेत आणि आपण १३ वर्ष एकत्र आहेत. पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी कायमच आपल्याला पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. सध्या ती तिच्या मुलांसह कुटुंबासह अधिक वेळ घालवतना दिसतेय.
सनी लियोनीला बॉलीवूडमध्ये येऊन अजून फारसा कालावधी झालेला नाही. मात्र अल्पावधीतच तिने रसिकांची पसंती मिळवली. सनी लियोनी ही पहिल्यांदा ‘बीग बॉस-५’ या रिअँलिटी शोद्वारे २0११ मध्ये पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर ‘जिस्म-२’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सनीने अंधेरी पश्चिम येथे एका आलिशान इमारतीत १२ व्या मजल्यावर अपार्टमेंट रजिस्टर केले आहे. २८ मार्च २०२१ रोजी तीने या अपार्टमेंटची १६ कोटी रूपयांना खरेदी केली होती.
Discussion about this post