हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. दोघा राजाराणीचा संसार सुखासुखी चालू असताना त्यात लुटुपुटुची भांडणे होत आहेत. अगदीच हि भांडणं फार सिरिअस घेण्यासारखी नाहीत. कारण ही भांडणं त्या दोघांच्या नात्याइतकीच गोड आहेत. थोडी लाडी गोडी थोडा रुसवा फुगवा असे काहीसे हे भांडण आहे. सिद्धार्थने इन्स्टा अकाऊंटवर एक गोड फोटो शेअर केला. पण या फोटोला त्याने दिलेले कॅप्शन पाहून मिताली कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. मग काय ? तिने कमेंट केली आणि तिच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुम्ही तिच्याकडे बराच वेळ बघत असता आणि अचानक तिची नजर तुमच्याकडे वळते तेव्हा…,’ असे कॅप्शन सिद्धार्थने आपल्या फोटोला दिले. यावर मितालीची कमेंट आली आणि बघता बघता तिच्या या कमेंटची चर्चा रंगली.
‘हे काय वागणं झालं?’असे मितालीने या फोटोवर कमेंट करताना लिहिले. बायको रागावलीये, हे समजायला सिद्धार्थला फार वेळ लागला नाही. मग काय, ‘अगं मी तुझ्याविषयीच बोलत होतो,’ असे मजेशीर लडिवाळ उत्तर सिद्धार्थने यावर दिले. सिद्धार्थ व मितालीचे हे गोड भांडण मग जगजाहिर झाले. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. ‘मेन विल बी मेन…,’ अशा काय काय मजेदार प्रतिक्रिया यावर उमटल्या.
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. पुढे जाऊन त्यांचे नाते आणखी बहरले आणि यावर्षीच्या जानेवारीत त्यांनी एकमेकांना सात जन्माचे वचन देत लग्नगाठ बांधली.
Discussion about this post