हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर किमान एकदा तरी काम करता यावे, असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. मात्र असा एक कलाकार आहे ज्याने अमिताभ बच्चन यांची लहानपणीची भूमिका चित्रपटांमध्ये साकारत रसिकांची वाहवा मिळवली होती. बालकलाकार रवी वलेचा याने अमिताभ बच्चन यांच्या लहान पानाची भूमिका अनेक चित्रपटांत साकारली होती. ‘बिग बी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असताना त्यांच्या बालपणाची भूमिका वाढविणारा हा कलाकार देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला होता.
Sir… Can you recognise him?
Hint – He was there in #AmarAkbarAnthony #MrNatwarlal #DeshPremee #Khuddaar #Shakti #Nastik and few more films of yours.
😉😉😉😉 pic.twitter.com/jEGHhVN2hx
— RJ🇬️9⃣ Divya (दिव्य) Solgama (@DIVYASOLGAMA) January 28, 2018
८० आणि ९० च्या दशकात रवीने अमिताभ यांच्या बालपणाची भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पडली होती. यशस्वी बालकलाकारांपैकी तो एक होता. मात्र आता हा बालकलाकार मोठा झालाय. आता रवी नेमके काय करतोय याबाबतची तशी कुणालाच माहिती नाही. बालपणी आपल्या लक्षवेधक अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रवीने ‘देश प्रेमी’, ‘शक्ती’, ‘कूली’, ‘अमर अकबर अँथोनी’ सारख्या बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांमध्ये अमिताभ यांची बालपणाची व्यक्तिरेखा साकारली होती.
तब्बल ३००हून अधिक चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका साकारणारा रवी अचानक चित्रपट सृष्टीपासून फार दूर गेला. नंतर त्याचे रसिकांना दर्शन झालेच नाही. शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करता यावे, म्हणून त्याने सिनेसृष्टीला राम राम ठोकल्याचे बोलले जाते. रवी वलेचाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटविलाच मात्र आज वेगळ्याच क्षेत्रात त्याने आपले नाव कमावले आहे.
At Radio Mirchi music awards pic.twitter.com/5nt7i00JUc
— Ravi Valecha (@ravivalecha) January 28, 2018
रुपेरी पडद्यावर लहानग्या अमिताभची भूमिका साकारणारा बालकलाकार रवी वलेचाने करिअरसाठी अभिनय क्षेत्राची निवड न करता, त्याचा व्यवसाय सुरु केला. बघता -बघता आज तो ३०० कोटींचा मालक बनला आहे. तो आज एक मोठा व्यावसायिक बनला आहे.अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून एमबीएची त्याने पदवी घेतली. त्यानंतर स्वत:ची कंपनी सुरू केली. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात आज रवी वलेचा एक मोठे नाव आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Discussion about this post