हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक स्पर्धक मीच जिंकणार या आत्मविश्वासाने खेळताना दिसतोय. मग यासाठी कुणाच्याही डोक्यावर उभं राहावं लागलं तरीही चालेल असेच सगळे वागत आहेत. खरंतर या घरात विविध नाती तयार होत असतात. कुठे मैत्रीचं, कुठे प्रेमाचं, कुठे भावा बहिणीचं तर कुठे जिगरी नाती जुळत असतात. पण यंदा घरात नाती जुळतायत कमी आणि तुटतायत जास्त. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये सहभागी झालेल्या अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी या अतिशय घट्ट मैत्रिणी बोलल्या जात असता असता असं काय फिस्कटलं कुणास ठाऊक कि त्या एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनची स्पर्धक अमृता धोंगडे सतत कुठे ना कुठे वादात आणि भांडणात दिसत आहे. अलीकडेच तिचे स्पर्धक यशश्री मसुरकर सोबत कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण शिळे होण्याआधीच तिचे तिची बेस्ट फ्रेंड म्हणजेच तेजस्विनी लोणारीसोबत जोरदार शाब्दिक भांडण झालं आहे. काही दिवसांपूर्वी या एकमेकींच्या एकदम घट्ट खास मैत्रिणी बोलल्या जात होत्या. पण आता अशी काही वादाची ठिणगी पडली आहे कि त्या दोघी एकमेकींवर आवाज चढून चढून भांडू लागल्या आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमो व्हिडीओनुसार, जेवण बनवण्याच्या मुद्द्यावर अमृता आणि तेजस्विनी यांच्यात जोरदार वाद झाले आहेत.
या प्रोमोमध्ये अमृता म्हणते, ‘तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? यावर तेजस्विनी म्हणते, तू जेवणावर राग काढतेस.. मी बनवणार नाही जेवण ही पद्धत बरी नव्हे..’ त्यावर अमृताचा पारा चढला आणि ती म्हणाली,. ‘हो हीच पद्धत आहे आता.’ त्यावर तेजस्विनी पण भडकते आणि म्हणते, ‘अरेरावीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं.’ पुढे अमृता म्हणते तू स्वतःची भाषा बघ आधी. यानंतर अमृता स्वतःशी बोलताना दिसते कि, ‘हिचं मन जपायचं.. तीच मन जपायचं.. सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी.’ आणि रडू लागते. यामुळे आता वाद वाढणार कि मिटणार हे तर आजच कळेल.
Discussion about this post