हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटिंगदरम्यान किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण १०० फूट खोल दरीत पडल्याची घटना घडली होती. शनिवारी १८ मार्च रोजी, संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली आणि त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तो मृत्यूशी झुंज देत होता आणि अखेर मंगळवार, पहाटे हि झुंज थांबली व त्याचा मृत्यू झाला.
https://www.instagram.com/p/CdAIxL3Iwm2/?utm_source=ig_web_copy_link
किल्ले पन्हाळा गड येथे झालेल्या या दुर्घटनेत १९ वर्षीय नागेश प्रशांत खोबरे (रा. हिप्परगा, जि. सोलापूर) याचे निधन झाल्याने मनोरंजन विश्वात हालहाल व्यक्त केली जात आहे. या अपघातात नागेशच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखमा झाल्या होत्या. गेले १० दिवस डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे नागेशने शेवटचा श्वास घेतला. माहितीनुसार, चित्रपटाच्या सेटवर नागेश घोड्यांची देखभाल करत असताना त्याचा अपघात झाला होता.
https://www.instagram.com/p/CdFYEQrlI7M/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान नागेशला चित्रीकरणासाठी बोलावणाऱ्या व्यवस्थापकांनी त्याच्या उपचाराचा खर्च देऊ, असे नातेवाईकांकडे कबूल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी कोणतीही रक्कम न दिल्यामुळे नागेशचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी व्यवस्थापकांवर केला आहे. यामुळेच जोपर्यंत उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत नागेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे चित्रपटाचे भविष्य धोक्यात आहे का काय..? अशी शंका उपस्थित होत आहे.
Discussion about this post