हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रिलीज होण्यासाठी फक्त काहीच दिवस उरले आहेत. दरम्यान या सिनेमाबाबत एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे. एकतर हा सिनेमा महाकाव्य रामायण मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात दाखवतो आहे.
शिवाय यामध्ये साऊथचा लोकप्रिय अभिनेता प्रभास श्रीरामाची तर बॉलिवूड सिनेविश्वाची लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सॅनॉन माता सीतेची भूमिका साकारते आहे. इतकेच काय तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसतो आहे. त्यामुळे या सिनेमाचं प्रमोशनसुद्धा प्रेक्षकांच्या उत्सुकतेनुसार एकदम जोरदार पद्धतीने सुरु आहे. नुकतेच या सिनेमाचे ५० फुटाहून अधिक मोठे फ्लेक्स तिरुपतीमध्ये झळकले आहेत.
पुढील आठवड्यात ‘आदिपुरुष’ हा सिनेमा थिएटर गाजवताना दिसणार आहे. तत्पूर्वी सिनेमाची संपूर्ण टीम जीव तोडून प्रमोशन करताना दिसते आहे. टीझरमुळे वादात अडकलेला हा सिनेमा रिलीज जवळ असताना इतका उत्सुकता निर्माण करणारा ठरेल असे कुणालाच वाटले नसेल.
पण आता बॉलिवूडसाठी हा सिनेमा मोठा धमाका ठरणार आहे असे स्पष्ट दिसत आहे. प्रभासची लोकप्रियता पाहता या सिनेमाबाबत साऊथमध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल आहे. त्यामुळे आदिपुरुषच्या स्वागताची साऊथमध्ये एकदम दणक्यात तयारी सुरु आहे.
दरम्यान नुकताच तिरुपतीमध्ये प्रभासच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त प्रभासच्या भूमिकेचे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीचे कट आऊट्स लावल्याचे दिसून आले.
शिवाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. ‘आदिपुरुष’चा हा इव्हेंट श्री वैंकटश्वेरय्या विद्यापीठाच्या मैदानात सुरु आहे. ‘आदिपुरुष’चा प्रीमिअर हा त्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये १३ जुन २०२३ रोजी होणार असून जगभरात हा सिनेमा ५ विविध भाषांमध्ये १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post