Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेत्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या; राहत्या घरात सापडला मृतदेह

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 31, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
47
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट आणि दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम सिनेसृष्टीसाठी हि बातमी एक मोठा धक्का आहे. मल्याळम अभिनेता सरथ चंद्रनने शुक्रवारी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना त्याच्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. रिपोर्टनुसार या अभिनेत्याने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा स्पष्ट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अभिनेता सरथ चंद्रन हा फक्त ३७ वर्षांचा होता. त्याच्या पश्चात त्याचा परिवार असून त्याच्या कुटुंबियांसाठी आणि सिनेसृष्टीसाठी हि बातमी अतिशय दुःखद आहे.

#SarathChandran found dead at 37, suicide note recoveredhttps://t.co/fDXqlcDPUX

— India Today Showbiz (@Showbiz_IT) July 31, 2022

अभिनेता सरथ चंद्रन याने मल्याळम सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अंगमली डायरीज’, ‘कुडे’ आणि ‘ओरू मेक्सिकन अपरथा’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही त्याने काम केलं आहे. अभिनेत्याच्या मागे आई- वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. सरथच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोटदेखील मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असं त्याने लिहिलं आहे. यामुळे नेमकं त्याने आपलं जीवन का संपवलं..? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने अभिनेत्याच्या आत्महत्येसंदर्भात वृत्त दिलं आहे. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कक्कड येथे राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. सरथने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून तूर्तास पोलिसांनी लावलेल्या अंदाजानुसार तो नैराश्यात होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर सरथ चंद्रनच्या निधनाचा शोक व्यक्त केला जात आहे.

Tags: Commits Suicidedeath newsSuicide NoteTweeter PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group