Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चिमुकल्या परीचा नादखुळा फॅन; रांगोळीतून साकारली बाप्पा आणि मायराची कलाकृती – पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 23, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच गणेशोत्सव कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत पार पडला. सर्वांचा लाडका बाप्पाने अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण करून आणि पुढच्यावर्षी पुन्हा येण्यासाठी आपल्या घरी मार्गस्थ झाला. तर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नवीकोरी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अगदी अल्पावधीतच लोकप्रिय होताना दिसतेय. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, या दोघांव्यतिरिक्त प्रेक्षकांचं लक्ष सर्वाधिक वाढतेय ती परी. मायरा वायकुळ ही बालकलाकार या मालिकेत परीची भूमिका साकारतेय आणि तीच फॅनफॉलोईंग दिवसागणिक वाढू लागलं आहे. नुकतेच तिच्या एका चाहत्याने तिच्यासाठी खास रांगोळी रेखाटली आहे. परी आणि तिचा लाडका बाप्पा असे कॅप्शन देत झी मराठीच्या इंस्टावर हि कलाकृती पाहायला मिळतेय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘आहे परी तर डोन्ट वरी’ म्हणत आपल्या निरागस अभिनयाने मायराने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आपल्या गोड हास्याने ती अनेकांचे टेन्शन दूर करतेय. त्यामुळॆ प्रेक्षकवर्ग देखील तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसत आहे. मालिकेतील तिचा हा निरागसपणा आणि भाबडेपणा प्रेक्षकांना चांगलाच भावतोय. त्यामुळे परीच्या एका चाहत्याने तिच्यासाठी खास सरप्राइज दिलं आहे. नुकतीच एका चाहत्याने मायरासोबत गणपती बाप्पा अशी ३D रांगोळी काढली आहे. ओमकार नलावडे असे या कलाकाराचे नाव आहे. ओमकारने कलेच्या अधिपतीला कलेतून वंदन केले आहेच. शिवाय मायराचेही चित्र रेखाटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हॅण्डलवरून या कलाकृतीच्या व्हिडीओ शेअर करण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेको प्रेक्षकांनी ओमकारच्या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच वाय्राल होताना देखील दिसत आहेत. यावर प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदेने देखील कौतुकास्पद अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, मायरासोबत बाप्पा अशी ही रांगोळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. तसंच या रांगोळीचा व्हिडिओ झी मराठीच्या ऑफिशियल इंस्तावरुन अनेक सोशल मीडिया युजर्स शेअर करीत आहेत.

Tags: instagramMyra WaikulPrarthana BehreRangoli ArtworkShreyas talpadeViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group