हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना काळातील लॉकडाउन उठल्यानंतर देशभर प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट मास्टर हा प्रचंड गाजला. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता या चित्रपटाचा लवकरच हिंदी रिमेक येणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य नायकाची भूमिका बॉलिवूडमधला दबंग म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान साकारणार आहे.
https://www.instagram.com/p/CMmXfsNB85T/?utm_source=ig_web_copy_link
आता या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असल्याने प्रेक्षकांची उत्कंठता वाढीस लागली आहे. त्याशिवाय सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार हि बातमी त्याच्या चाहत्यांसाठी विशेष पर्वणीच म्हणावे लागणार आहे. चित्रपटाची रंजक कथा वाचल्यावर सलमानने यात काम करण्याची तयारी दर्शविली आहे.
अशा या बहुचर्चित चित्रपटाचा हिंदी रिमेक कबीर सिंह या चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एंडेमॉल शाईन निर्मित करणार आहेत. मास्टर चित्रपटात मुख्य भूमिका सलमान खान यानं करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून निर्माता मुराद खेतान त्याच्यासोबत चर्चा करत आहेत. बॉलीवूड मसाल्यासाठी कथानकात काहीसे बदल करावेत, असे सलमानने निर्मात्यांना सुचवल्याचं वृत्त आहे. त्यामुळे येत्या काळात सलमान खानचा दमदार चित्रपट चाहत्यांना बघायला मिळू शकतो.
सध्या सलमानचे चाहते त्याच्या राधे-द मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभू देवा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जबरदस्त ऍक्शन सिनेमा असून, २०२१ मध्ये प्रदर्शित होणारा हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.
यामध्ये सलमान खानसह जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेसह सलमान खान सध्या टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुंबईत सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, जूनमध्ये याचे उर्वरीत शूटिंग परदेशात करण्याचे नियोजन आहे. सप्टेंबरमध्ये हे शूटिंग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. किक २ या चित्रपटातूनही सलमान खान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडीयादवाला निर्मित कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातही सलमान खान काम करणार आहे. एकंदर काय तर येत्या वर्षात सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे घेऊन प्रस्तुत होणार आहे.
Discussion about this post