Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

केरळच्या मशिदीत हिंदू जोडप्याचा शुभविवाह; ए.आर.रहमान यांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 5, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
156
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबाबत मोठा वाद सुरु आहे. या चित्रपटात दाखवलेले कथानक हे चुकीचे असल्याचा आरोप लावला जात आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी येण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. हा चित्रपट पूर्णपणे वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटानंतर आता ‘द केरला स्टोरी’ संपूर्ण देशभरात मोठ्या वादाचा विषय ठरला आहे. असे असताना ए.आर.रहमान यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडीओ ट्विट करत या प्रकरणात उडी घेतलीय.

Bravo 🙌🏽 love for humanity has to be unconditional and healing ❤️‍🩹 https://t.co/X9xYVMxyiF

— A.R.Rahman (@arrahman) May 4, 2023

ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर.रहमान यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ रीट्विट केला आहे. या व्हिडिओत केरळमधील चेरुवल्ली मशिदीमध्ये एका हिंदू जोडप्याचा हिंदू रितीरिवाजानुसार विवाहसोहळा होताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विट करत ए.आर.रहमान यांनी लिहिले आहे कि, ‘मानवतेवरचं प्रेम हे बिनशर्त आणि भरभरुन असावं’. हा व्हिडीओ साधारण १ मिनिट ४७ सेकंद इतका आहे. या व्हिडिओमध्ये केरळमधील अलाप्पुझा शहरातील चेरुवल्ली मशिदीत या हिंदू जोडप्याचे लग्न मोठ्या धामधुमीत पार पडले आहे.

THE KERALA STORY – SAVE OUR DAUGHTERS FROM ASURSpic.twitter.com/4O6h4HMdVm

— Anshul Pandey (@Anshulspiritual) April 26, 2023

या अनोख्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक लोकांनी इथे हजेरी लावली होती. या हिंदू जोडप्यातील वधूचे नाव अंजु आणि वराचे नाव शरद असे आहे. त्यांनी मुस्लिम मशिदीत हिंदू विधीनुसार लग्न केलं आहे आणि त्यांच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओनुसार, वधू अंजुची आई हि आर्थिक अडचणीत असल्यामुळे तिने आपल्या मुलीच्या लग्नासाठी मशिदीच्या समितीकडे मदतीसाठी संपर्क साधला होता. यावेळी मशीद समितीने मुलीला २० लाख रुपये आणि १० सोन्याचे दागिने दिल्याची माहिती या व्हिडिओतून दिली जात आहे. सध्या हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असून या एकतेचे उदाहरण निर्माण करणाऱ्या लग्नसोहळ्याचे सर्व स्तरांवर कौतुक केले जात आहे.

Tags: A.R.RahmanThe Kerala StoryTrending PostTwitter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group