हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच ऑलिम्पिक सुरु होणार असून त्यात अव्वल कामगिरी बजाविण्यासाठी टीम इंडिया सर्व तयारीनिशी सज्ज आहे. दरम्यान त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक उत्साहपूर्वक चिअर्स साँग तयार करण्यात आले आहे. मुख्य बाब अशी कि, या गाण्याला जगप्रसिद्ध ऑस्करविजेते गायक ए.आर.रेहमान यांनी संगीत दिले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. सोशल मीडियावर हे गाणे जोरदार व्हायरल झाले असून अगदी काहीच दिवसांत चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. हिंदूस्थानी वे असे या गाण्याचे शीर्षक आहे. येत्या २३ जुलै २०२१पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर दोन दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला होता.
या गाण्याची गायिका अनन्या बिर्ला ही मूळ भारतीय गायिका आहे. जिने इंटरनॅशनल पातळीवर अत्यंत लोकप्रियता मिळवली आहे. ती प्रसिद्ध व्यावसायिक कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. तिने या गाण्याविषयी व्यक्त होताना लिहिले आहे की, टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय स्पर्धकांसाठी गाणं तयार करणं ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. या निमित्तानं त्यांचा उत्साह वाढविण्याची संधी आपल्याला मिळते आहे. ही विशेष बाब म्हणता येईल. हे गाणं लिहिणं आणि ते गाणं अभिमानास्पद आहे.
येत्या २३ जुलै २०२१ पासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिकमधील स्पर्धा दिनांक ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेसाठी थीम साँग तयार करण्याचे काम ऑस्कर विजेते ए आर रेहमान यांनी केले असून नेहमीप्रमाणे त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या बजावली आहे. त्यांनी या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले होते. शिवाय हे माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे, असेही ते म्हणाले होते. ए आर रहमान यांनी ‘हिंदूस्थानी वे’ नावाचे गाणे संगीतबद्ध केले आहे.
हे गाणे अनन्या बिर्लाने निरमिका सिंग आणि शिशिर सामंत यांच्यासह मिळून लिहिले आहे. याआधी अनन्याने काही इंग्रजी गाणीदेखील लिहिली आहेत. मुळात २०२० सालात टोकियो ऑलम्पिक होणार होते. मात्र त्यावेळी कोरोनामूळे नियोजन फिस्कटले. त्याचा परिणाम या स्पर्धेच्या आयोजनावर झाला आणि केलेली तयारी वाया गेली. यानंतर आता पुन्हा नव्या जोमाने तयारी करण्यात आली आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेण्यात आली असून आरोग्याचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये म्हणून धोका पत्करला जाणार नसल्याचे नियोजन केले असल्याची माहिती समितीने दिली आहे.
Discussion about this post