Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पहिलं मुख्यमंत्रीपद ठाण्याला..; मराठी सिनेसृष्टीतून शिंदेंवर शुभेच्छांचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं. पण ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलला पण पक्ष तोच आहे. याचा आनंद सगळ्यांनाच आहे. याच आनंदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शुभेच्छा मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी दिलेल्या असून त्यांचे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या कलाकारांमध्ये दिग्दर्शक, निर्माते, अभिनेता, अभिनेत्री अशा प्रत्येकाचा समावेश आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे प्रथम स्मरण करून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. काही क्षणचित्रे.#Maharashtra pic.twitter.com/IRGE1NIJFg

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओक, आरोह वेलणकर, विजू माने, हेमंत ढोमे, अभिजित पानसे, रितेश देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रितेशने दोन ट्विट केले आहे. त्यातील एका ट्विटमध्ये रितेशने एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. ‘श्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा,’ असे ट्विट केले आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अभिनेता प्रसाद ओक याने शिंदेंसोबतचा फोटो शेअर करत इंस्टावर लिहिले आहे कि, मा. मुख्यमंत्री… श्री एकनाथजी शिंदे साहेब… मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!

Congratulations to @Dev_Fadnavis and @mieknathshinde with your leadership our state is bound to fly high and cover up the lost ground in the last 2.5 years. All the best. Looking forward. 🇮🇳

— Aroh Welankar (@ArohWelankar) June 30, 2022

तर अभिनेता आरोह वेलणकर याने ट्विट करीत लिहिले कि, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र यशाचे शिखर गाठो. तसेच गेल्या अडीच वर्षात झालेले नुकसान भरून काढा. खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच पुढे जात राहा’. याशिवाय विजू माने यांनी शिंदेंसोबतचा एक फोटो शेअर करीत लिहिले आहे कि, पहिलं मुख्यमंत्रीपद ठाण्याला.

View this post on Instagram

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करीत लिहिले आहे कि, आपल्या महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन… आपल्या हातुन महाराष्ट्राची सदैव सेवा घडत राहो… मनःपुर्वक शुभेच्छा! जय मराहाष्ट्र!

आपल्या महाराष्ट्राचे नवनिर्वाचित
मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे
आणि
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस
यांचे हार्दिक अभिनंदन…
आपल्या हातुन महाराष्ट्राची सदैव सेवा घडत राहो… मनःपुर्वक शुभेच्छा! जय मराहाष्ट्र! @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/8jiv4IK23v

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 30, 2022

अभिजित पानसे यांनी ट्विट करीत लिहिले आहे कि, तशी राजकीय मतभिन्नता असो वा एकंदरीत ज्या प्रकारे हे सगळं घडलं त्यविषयाबद्दल काही म्हणणं… पण ठाण्याचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल एक ठाणेकर म्हणून अभिनंदन करायलाच हवं. अभिनंदन श्री. एकनाथजी शिंदे.

तशी राजकीय मतभिन्नता असो वा एकंदरीत ज्या प्रकारे हे सगळं घडलं त्यविषयाबद्दल काही म्हणणं… पण ठाण्याचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल एक ठाणेकर म्हणून अभिनंदन करायलाच हवं. अभिनंदन श्री. एकनाथजी शिंदे. @mieknathshinde

— Abhijit Panse (@abhijitpanse) July 1, 2022

अशाप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी ठाण्याच्या अपहील्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून कौतुक करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: Abhijit panseAroh WelankarCM Of MaharashtraEknath ShindeHemant DhomePrasad OakViju Mane
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group