हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय कॉमिक अभिनेता सिद्धार्थ जाधव गेली अनेक वर्ष सिने विश्वातील विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नेहमीच आनंदी, हसतमुख, उत्साही आणि अत्यंत नम्र असा सिद्धू आपल्या कलागुणांनी नेहमीच असेल तिथे एनर्जी तयार करतो. यामुळे मराठी मनोरंजन विश्वात त्याची प्रचंड हवा आहे. आज सोशल मीडियावर त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यामध्ये अभिनेता, कॉमिक अभिनेता, एंटरटेनर या भूमिका सोडून तो थेट कविवर्य झाला आहे. त्याची हि कविता ऐकलं तर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही इतकं नक्की!!
सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमातील आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर हे कार्यक्रमात आल्याचे दिसत आहे. यावेळी सिद्धार्थ म्हणाला, ‘एखादं गाणं हिट झालं कि त्याची चाल माझ्या मनात बसते आणि मला शब्द सुचतात. असंच एक गाणं मी अप्सरा आली या लावणीच्या चालीवर लिहिलं आहे. क्षणभर विश्रांतीच्या सेटवर मी आणि संजय जाधव निवांत वेळ असा घालवायचो’. यावर अवधूत गुप्ते म्हणतो कि, ‘महाकवी ऐकवा की मग..’
यावर सिद्धार्थ अप्सरा आली’ गाण्याच्या चालीवर गातो,
‘कोमल बारमध्ये.. झपकण घुसले.. ऑर्डर दिली वेटरला..
वेटर आला, गालात हसला.. कॉटर दिली त्याने मला..
ही कॉटर नकली.. इंग्लिश असली.. आणायला सांगितली..
मी चार चार बाटल्या झपझप घेतल्या.. चक्कर मला आली.. झपकन खालीsssssss..’ त्याची ही लावणी ऐकून सगळेच हसू लागतात. मग अवधूत म्हणतो, ‘अरे तु जितेंद्र जोशीला आव्हान देतोय.. लिखाणाच्या बाबतीत’. तर सिद्धू म्हणाला, ”छे.. तोच माझा पुतळा समोर ठेऊन लिहितो.. तो एकलव्य आहे आणि मी द्रोणाचार्य आहे.’ त्यांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Discussion about this post