हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी भाषेसाठी अनेक लोकांच्या मनात आत्मियता आहे. हे अनेकदा अनेक गोष्टींमधून दिसून आले आहे. आजही मराठी नाटक, चित्रपट आणि मराठी कार्यक्रमांना एक विशेष स्थान आहे आणि उद्याही हे स्थान कायम राहणार. कारण मराठी भाषा केवळ भाषा नाही तर अभिमान आहे. म्हणून मराठी कलाकारांनी एकवटून मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी ‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले आहे. याशिवाय ‘अभिजात मराठी जनअभियान’ सुरु करण्यात आलेले आहे. माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महा मोहीम राबवून राष्ट्रपतींकडे याचिका दाखील कारण्यासाठी एक QR code व्हायरल करण्यात आलेला आहे. शिवाय हि वेळ आहे सर्व मराठी भाषीकांनी एकजूट दाखविण्याची असा संदेश देखील सोबत व्हायरल होतोय.
मराठी लोकांनी एकत्र येऊन सजग होत आपल्या हक्कासाठी आणि आपल्या भाषेसाठी लढले पाहिजे असे कलाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता मराठी कलाकार मोठ्या संख्येने एकवटले आहेत. उद्या शुक्रवारी अर्थात १९ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ असे असून हा कार्यक्रम अत्यंत विशेष असणार आहे. हा कार्यक्रम कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ७.०० वाजता सुरु होईल. विशेष असे कि, ‘झी’ मराठीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या होऊ घातलेला ‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे आहे. तर लेखन श्रीरंग गोडबोले आणि विघ्नेश जोशी यांचे आहे. शिवाय संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. यामध्ये स्पृहा जोशी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हृषिकेश जोशी व चंद्रकांत काळे यांचे कविता वाचन होणार आहे. तर हृषिकेश कामेरकर, केतकी भावे, धनश्री देशपांडे, मंगेश बोरगावकर, पृथ्वीराज माळी व चंद्रकांत काळे यांच्या सुमधुर गीतांचा आनंद श्रोते मंडळींना घेता येईल. तसेच शुभंकर तावडे, धनश्री काडगावकर, मयूरेश पेम आणि केतकी पालव यांचा नृत्याविष्कार सादर होईल.
Discussion about this post