Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इस्लामी संप्रदाय ‘सुफी’ हा ‘वारकरी’ संप्रदायाशी मिळता जुळता; किरण मानेंची धर्मांवर मार्मिक पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 10, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र
Kiran Mane
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १० जुलै २०२२. आजचा दिवस फारच वेगळा आहे. आज महाराष्ट्राचा महाउत्सव अर्थात आषाढी एकादशी आहे. तर याचसोबत संगम साधत आजच बकरी ईदसुद्धा आहे. मग साजरा करायचा तरी कोणता सण…?असा काहींना प्रश्न सतावत असेल. तर मित्रहो…, आपले लाडके किरण माने यांनी दोन्ही सणांचा संगम साधत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. ज्याचा आशय हा धर्म वा कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही. तर माणसा- माणसातली जिवाभावाची वृत्ती जागवण्याचा आहे.

तर अभिनेता किरण माने यांनी लिहिलंय कि, …आपला तुकोबाराया विठ्ठलामधी गौतम बुद्धाला बघत होता हे “बौद्ध्य अवतार माझीया अदृष्टा” सारख्या अभंगामधनं कळतं… गाथेतल्या कित्येक अभंगांत बुद्धविचार सापडतो. तसंच, काही अभंगांमधनं हे बी कळतं की, तुकोबाराया ‘अल्ला आनि इठूराया’लाबी वेगळं मानत नव्हता ! पन काय गंमत हाय बघा की.. विठ्ठल-बुद्ध आनि अल्ला यांना मानणार्‍यांमध्ये मात्र आपल्याला फूट पडलेली दिसते. भिंतीच उभ्या र्‍हायल्यात मानसामानसात. का होत आसंल वो असं?असं? मी बर्‍याचदा तुकोबारायाचे अल्लावरचे अभंग काढून समजून घेत बसतो. उर्दू,फारसी आनि मराठी शब्दांनी सजवलेल्या त्या अभंगाचा अर्थ लावनं, हे खायचं काम नाय भावांनो… पन तो लागला आनि मेंदूत मुरला तर या भेदाभेदाच्या भिंती धडाधडा कोसळतात.

“आवल्ल नाम आल्ला बडा लेते भूल न जाये” …या अभंगाचा आशय खोलात जाऊन अभ्यासताना मला एक लै इंटरेस्टिंग गोष्ट सापडली ! त्या अभंगाच्या शेवटी तुकोबाराया म्हन्तो “एक तीर नहीं प्यार जीतनकी आस । कहे तुका सो हि मुंडा राखलिये पायेनपास ।।” याचा अर्थ असा की…”पैलतीर गाठणं अर्थात मुक्ती-मोक्ष वगैरे मिळवणं हा माझा उद्देश नाही, तर मला फक्त प्रेम जिंकण्याची आस आहे. त्यामुळे ‘मुंडां’नी मला त्यांच्या पायाशी रहाण्याचा आनंद घेऊ द्यावा.” …’मुंडा’ म्हन्जे काय? तुकोबाराया एवढं आदरानं नांव घेत्यात म्हन्जे कायतरी वेगळं असनार. हिंदी पिच्चरमधी प्रेयसी प्रियकराला ‘मुंडा’ म्हन्ताना लै वेळा ऐकलंय आपन. पन ह्या शब्दाचा खरा मूळ अर्थ मला तळाशीकर गुरूजींच्या ग्रंथात सापडला. तिथं लिहीलंय ‘मुंडा’ म्हन्जे ‘मुस्लीम संतांचा एक प्रकार’. तुकोबारायांच्या काळात तर मुस्लीम सूफ़ी संतांचा हिंदू-मुस्लिम जनतेवर लै पगडा होता. म्हन्जे तुकोबारायांनी ‘सूफ़ी संतांच्या पायाशी रहान्याचा आनंद’ मागीतलाय ! सूफ़ींचं अल्लाला साद घालनं, हे हिंदूंच्या देवाला आळवण्याच्या पद्धतीशी मॅच होनारं हाय. हाच अभंग मी पुन्हा त्या अंगानं वाचल्यावर लक्षात आलं, तुकोबारायानं हे तर ‘सूफ़ी’ भक्तीगीतच रचलंय… जे मुस्लीम संत आनि फकीर गातात !

…तुम्हाला म्हायतीय का? ‘सूफ़ी’ हा इस्लाममधला असा संप्रदाय हाय, जो आचारविचारांनी आपल्या ‘वारकरी संप्रदाया’शी मिळताजुळता हाय ! हा सुद्धा एकेश्वरवादी संप्रदाय हाय, जो धार्मिक कट्टरतेपास्नं लांब हाय. कर्मकांड मानत नाय. प्रेम आणि नामस्मरण हीच ईश्वरापर्यन्त पोहोचन्याची खरी वाट हाय असं या संप्रदायाचं माननं हाय. सर्वधर्मसमभाव, मानवता, उदारमतवाद यासाठी सूफ़ी संप्रदाय प्रसिद्ध हाय. आपल्या वारकरी संप्रदायाचीबी शिकवन हीच हाय ! हाय का नाय गंमत? असंच नातं बौद्ध धम्मातल्या ‘चारिका’ आनि आपली वारकर्‍यांची ‘दिंडी’ या दोन्हीत सापडतं ! बौद्ध भिक्खू पायी चालत निघतात. ठिकठिकाणी लोक स्वखुशीनं,स्वखर्चानं त्यांच्या जेवणा-रहाण्याची सोय करतात. दिंडीतबी वारकर्‍यांना जेवण देणं, त्यांची सेवा करणं हे सन्मानाचं समजलं जातं. थोडाफार फरक असला तरी दोन्हीचं मूळ उद्दिष्ट हे ‘समता-बंधुता’ रूजवनं हेच हाय !

हिंदू-मुस्लीम-बौद्ध एकतेची नाळ किती जुनी हाय बघा भावांनो. असंच आपल्याला इतरही धर्मांबाबतीत सापडतं. बुद्ध, बसवण्णा, महावीर, मोइनुद्दीन चिश्ती, नामदेव, गुरूनानक, कबीर, तुकाराम…अशा सगळ्यांचं एकमेकांशी घट्ट वैचारीक नातं हाय.. पन आज यांचे अनुयायी मात्र एकमेकांना पान्यात बघतात. म्हन्जे, आपनच या महामानवांच्या विचारांना नीट समजून घेन्यात कुठंतरी कमी पडतो. हेच सांगायला बहुतेक आज आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद आलीय ! फराळ करायचाच आसंल तर संतांच्या समतेच्या, मानवतेच्या विचारांचा करूया आनि क़ुर्बानी द्यायचीच आसंल तर भेदभावाची, उच्चनीचतेची देऊया…ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल – किरण माने.

Tags: Facebook PostKiran ManeSocial Media PostTV Actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group